दि. ३१.०५.२०२२ रोजी शिमला, हि.प्र. येथे झालेल्या गरीब कल्याण संमेलन या कार्यक्रमाचे आभासी प्रक्षेपण कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा येथून करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार पुरस्कृत जन कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींशी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांनी संवाद साधला. तसेच शेतकर्यांना त्यांनी संबोधित केले. याप्रसंगी कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे गरीब कल्याण संमेलन व खरीप पूर्व शेतकरी मेळावा या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. श्री. संजयजी गायकवाड, आमदार, बुलढाणा यांची उपस्थिती लाभली. तसेच ओमसिंग राजपूत, श्यामभाऊ पवार, गोपाल भाग्यवंत आदि शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकार पुरस्कृत जन कल्याणकारी योजनांचा आढावा घेत विकेल ते पिकविण्यासाठी शेतकरी बांधवांनी तयार राहावे, असे आवाहन मा. श्री. संजयजी गायकवाड, आमदार, बुलढाणा यांनी केले.
त्यानंतर खरीप पूर्व शेतकरी मेळावा अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा येथील डॉ. जगदीश वाडकर, डॉ. भारती तिजारे, श्री. राहुल चव्हाण, श्री. प्रवीण देशपांडे, डॉ. नरेंद्र देशमुख, मनेश यदुलवार ई. कृषि शास्त्रज्ञांनी उपस्थित शेतकरी व भगिनींना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा तर्फे खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या वाणनिहाय बियाण्यांची प्रदर्शनी लावण्यात आली होती, जेणेकरून शेतकरी वर्गाला पेरणी प्रक्रियेसाठी लागणाऱ्या वाणाची निवड सहजपणे करता येईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनेश यदुलवार यांनी केले तर प्रास्ताविक पर विचार डॉ. जगदीश वाडकर यांनी मांडले. उपस्थितांप्रती आभार डॉ. नरेंद्र देशमुख यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्ह्यातील ५०० पेक्षा जास्त शेतकरी बांधव व महिला भगिनींनी उपस्थिती दर्शवित कार्यक्रमाचा लाभ घेतला. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा येथील डॉ. जगदीश वाडकर, डॉ. भारती तिजारे, श्री. राहुल चव्हाण, श्री. प्रवीण देशपांडे, डॉ. नरेंद्र देशमुख, मनेश यदुलवार, शिवाजी पिसे, नितीन काटे, कोकिळा भोपळे, अनिल जाधव, संदीप तायडे, अनुराधा जाधव, रणजीत सदार आदींनी परिश्रम घेतले.