श्रद्धेय वसंतरावजी नाईक यांच्या जयन्तिनिमित्य कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा (डॉ. पं.दे.कृ.वि.,अकोला) व कृषी विभाग, बुलढाणा -महाराष्ट्र शासन , यांच्या वतीने कृषी दिनाच्या औचीत्यावर तंत्रज्ञानावर आधारित खरीप हंगाम शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे व कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे दि. ०१.०७.२२ रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. एस. रामामूर्ती-जिल्हाधिकारी, श्री. नरेंद्र नाईक- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,डॉ. अनिल एस. तारू- वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख , कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा डॉ. सी.पी. जायभाये, प्रमुख-कृषी संशोधन केंद्र, डॉ. सतीशचंद्र जाधव-प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय तसेच श्रीमती. अनिसा महाबळे- कृषी विकास अधिकारी, श्री. महेश झेंडे- संचालक, कृषी आयुक्तालय, श्री. विक्रम पठारे- जिल्हा व्यवस्थापक-नाबार्ड आदि मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. अनिल तारू यांनी केले. याप्रसंगी अन्नसुरक्षा व कृषी शिक्षण हि काळाची गरज आहे असे श्री. एस. रामामूर्ती-जिल्हाधिकारी म्हणाले. तर अधिक उत्पन्नासोबत मातीच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या असे आवाहन श्री. नरेंद्र नाईक- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. सध्याचा लांबलेला पाऊस व आपत्कालीन पिक व्यवस्थापन याविषयी डॉ. सी.पी. जायभाये यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी श्री. बाळकृष्ण पाटील, व श्रीमती. अनिता पवार यांना त्यांच्या शेतीतील उल्लेखनीय कार्यासाठी वसतंराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच रासायनिक खतांचा अवास्तव वापर टाळण्यासाठी जि. प. कृषी विभागाद्वारे संतुलित खतांचा वापर आणि खराब हवामान परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान यासाठी हवामान आधारित फळ पिक विमा योजना या पत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
कार्याक्रमाचे सूत्रसंचालन मनेश यदुलवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथील डॉ. भारती तिजारे, डॉ. जगदीश वाडकर, डॉ .नरेंद्र देशमुख, श्री. राहुल चव्हाण, श्री,. प्रवीण देशपांडे, श्री, शिवाजी पिसे, कु. कोकिळा भोपळे, श्री. अनिल जाधव, श्री. संदीप तायडे, कु. अनुराधा जाधव व कृषी विभाग येथील श्री. संतोष डाबरे- उपविभागीय- कृषी अधिकारी, श्री. विजय बेत्तीवाड- कृषी उपसंचालक , उमेश जाधव-समन्वयक, पोक्रा प्रकल्प आदींनी परिश्रम घेतले.