कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा हे नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याचे कार्य विविध माध्यमातून आजवर करत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा व आंबा प्रेमींना विविध जातींच्या आंब्याची चव चाखता यावी यासाठी कृषि विज्ञान केंद्र, अजिंठा रोड, बुलढाणा येथे कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा, कृषि विभाग, बुलढाणा,आत्मा, बुलढाणा व महिला आर्थिक विकास महामंडळ, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दि. १७ मे, २०२४ रोजी सकाळी ०९:०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत “भव्य आंबा महोत्सव:आंबा प्रदर्शनी व विक्री” चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील बऱ्याच आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ४० जातींचे आंबे प्रदर्शनीमध्ये विक्रीकरिता दालनात ठेवण्यात आले होते. तसेच आंब्यावर प्रक्रिया व मूल्यवर्धन केलेल्या विविध खाद्य पदार्थांचे महिला बचत गटांचे ७ दालन यावेळी लावण्यात आले होते.
या आंबा महोत्सवाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते पार पडले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरद गडाख, सन्माननीय कुलगुरू, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला हे होते. विशेष आणि प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. धनराज उंदिरवाडे, संचालक, विस्तार शिक्षण , डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला, डॉ. सावजी, सहयोगी अधिष्ठाता- निम्न कृषी शिक्षण, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला तसेच डॉ. किशोर बिडवे, जनसंपर्क अधिकारी, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री. मनोजकुमार ढगे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्री. पुरुषोत्तम उन्हाळे, प्रकल्प संचालक-आत्मा, श्री. बाळासाहेब मोहन,मुख्य कार्यकारी अधिकारी , जि. प. बुलढाणा डॉ. दिनेश कानवडे,प्रमुख-कृषी संशोधन केंद्र, बुलढाणा आणि डॉ. सतीशचंद्र जाधव , प्राचार्य-कृषी तंत्र विद्यालय, बुलढाणा आणि श्री. समीर देशमुख, सहजिल्हा समन्वय अधिकारी, माविम, बुलढाणा आणि श्री. विनायक सरनाईक, माजी कार्यकारी परिषद सदस्य, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला यांची सुद्धा विशेष उपस्थिती लाभली.
: महोत्सवाची ठळक वैशिष्ट्ये- स्थानिक आंबा जातींची ओळख, आंबा फळाच्या विविध वाणांची प्रदर्शनी व विक्री, आंबा लागवड व व्यवस्थापन- तज्ञाचे मार्गदर्शन आणि आंब्याच्या वाणांची कलम विक्री तसेच आंब्यापासून बनविलेले विविध प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध.
या आंबा महोत्सवाच्या आयोजनामागील पार्श्वभूमी प्रास्ताविकाद्वारे डॉ. अनिल तारू, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी मांडली. श्री. पुरुषोत्तम उन्हाळे, प्रकल्प संचालक-आत्मा, यांनी आंब्याच्या स्थानिक जाती व जैवविविधतेची सांगड घालून शेतकऱ्यांनी आंबा लागवड करावी असे आवाहन केले. श्री. मनोजकुमार ढगे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यांनी आंबा फळबाग लागवड व तत्संबंधी शासनाच्या योजना याविषयी उपस्थितांना संबोधित केले.
डॉ. धनराज उंदिरवाडे, संचालक, विस्तार शिक्षण , डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला, यांनी जिल्ह्यात आंब्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व आत्मा यांनी संयुक्तपणे कार्य केले पाहिजे असे विषद केले. तसेच येणाऱ्या खरीप हंगामातील मुख्य पिक म्हणून सोयाबीनवर येणाऱ्या किडींना रोखण्यासाठी बिजप्रक्रीयेचे महत्व सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पं.दे.कृ.वि.,अकोला यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आंबा घन लागवड पद्धतीचे फायदे उपस्थितांना सांगितले तसेच भारतीय आंबा फळाला आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारपेठेत प्रचंड मागणी असल्याने त्याच्या लागवडीखालील क्षेत्राचा विस्तार व्हावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांपुढे व्यक्त केली.
कार्यकर्माचे सूत्रसंचालन मनेश यदुलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.भारती तिजारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. अनिल तारू, डॉ.एन.एस.देशमुख,डॉ.भारती तिजारे,श्री.प्रवीण देशपांडे,श्री.मनेश यदुलवार, कु. कृतिका गांगडे, कु.कोकिळा भोपळे.कु.अनुराधा जाधव,श्री.अनिल जाधव,श्री. शिवाजी पिसे व श्री. नयन चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील आंबा प्रेमी, शेतकरी व शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
