कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे ९४ वा भारतीय कृषी अनुसंधान परिषद (भा.कृ.अ.प.) स्थापना दिवस साजरा 16.07.2022

दि. १६ जुलै,१९२९ या दिवशी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची स्थापना झाली व आज रोजी त्या घटनेला ९४ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने दिल्ली येथून श्री. नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषी मंत्री, किसान कल्याण व कृषी मंत्रालय, भारत सरकार यांनी गेल्या पाच वर्षात देशातील ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे त्यांचेशी आभासी प्रणालीने संवाद साधला. याप्रसंगी श्री. कैलास चौधरी व श्री. पुरुषोत्तम रुपाला, राज्यमंत्री किसान कल्याण व कृषी मंत्रालय, भारत सरकार तसेच डॉ. त्रिलोचन मोहोपात्रा, महासंचालक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याचे औचित्य साधून कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे आज दि. १६.०७.२०२२ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमाचे आभासी पद्धतीने दूरचीत्रवाणीद्वारे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे गेल्या पाच वर्षात उत्पन्न दुप्पट झाले आहे असे श्री. गणेश तायडे, श्री. भीमसिंग कालोद आदींसह प्रगतीशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                 याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अनिल तारू तसेच कृषी शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र, देशमुख, डॉ. जगदीश वाडकर, डॉ. भारती तिजारे, श्री. प्रवीण देशपांडे, श्री. मनेश यदुलवार व श्री. नितीन काटे,श्री. शिवाजी पिसे, कु. कोकिळा भोपळे, श्री. अनिल जाधव, श्री.संदीप तायडे, श्री. रणजीत सदार, कु. अनुराधा जाधव ई. उपस्थित होते.

Author: kvk-buldhana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *