डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे ‘शिवार फेरी – २०२६’ उत्साहात संपन्न!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ , अकोला, द्वारे आयोजित तीन दिवसीय शिवार फेरी दि. २० सप्टेंबर २०२६ ते २२ सप्टेंबर,२०२६) च्या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, कृषी विभाग व आत्मा, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले.या शिवार फेरीदरम्यान माननीय जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.,बुलढाणा) , श्री. गुलाबराव खरात यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विविध प्रक्षेत्रांना भेट देऊन पीक प्रात्यक्षिके, कृषी तंत्रज्ञान व जलव्यवस्थापनाशी संबंधित बाबींची माहिती घेतली.

प्रामुख्याने या शिवार फेरीमध्ये खरीपातील सोयाबीन,तूर,कपाशी व ज्वारी आणि भरडधान्य तसेच भाजीपाला पीके , फुलपिके यांचे प्रात्यक्षिक प्रक्षेत्र हे कृषी तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे होते. याद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध शेती पद्धतीबद्दल व उत्पादन वाढीबद्दल माहिती मिळाली.

यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने व उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शिवार फेरीदरम्यान शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या प्रक्षेत्र/शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संशोधनाधारित आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ आणि शेतकरी यांच्यातील समन्वयामुळे हा उपक्रम अधिक परिणामकारक ठरला.

“विद्यापीठातील तंत्रज्ञान शेताच्या बांधापर्यंत आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष वापरापर्यंत पोहोचविणे” हा या शिवार फेरीचा मुख्य उद्देश असून, अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून आधुनिक, शाश्वत व अधिक उत्पन्नक्षम शेतीला निश्चितच चालना मिळेल असे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी काढले . ते पुढे म्हणाले की शेतीच्या शाश्वततेसाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या नवीनतम
तंत्रज्ञानाचा अवलंब करावा व आपापल्या शेतीच्या विकासासाठी सातत्याने कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहावे असे आवाहन शेतकऱ्यांना यावेळी केले.

Avatar photo

Author: kvk-buldhana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *