सेवा संकल्प अभियान कार्यक्रम-२०२६ संपन्न

कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ यशस्वीरीत्या राबविण्यात आले. या अभियानांतर्गत एकूण २३ विविध उपक्रमांच्या माध्यमातून २,७८७ शेतकरी, महिला शेतकरी व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून प्रत्यक्ष मार्गदर्शन व सेवा पुरवण्यात आली. या अभियानात नैसर्गिक शेती प्रात्यक्षिके, शिवार फेरी, प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन कीड व रोग व्यवस्थापन, जैविक निविष्ठांचे वाटप, बियाणे प्रक्रिया व तांत्रिक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तसेच जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण आणि मूल्यवर्धनाद्वारे महिला सक्षमीकरण यांसारख्या विषयांवर विशेष भर देण्यात आला. ‘सेवा माझे योगदान’ या सामाजिक उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान, आरोग्य व स्वच्छता जनजागृती आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत’ संकल्पनेवर आधारित कृषी चर्चासत्रे व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. अमोल झापे, डॉ. अनिल तारू, डॉ. जगदिश वाडकर, डॉ. सुकेशनी वाणे व इतर विषय तज्ज्ञांच्या थेट संवादाने आणि मार्गदर्शनाने जिल्ह्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन होऊन शाश्वत व आधुनिक तंत्रज्ञानाधारित शेतीला मोठी चालना मिळाली.

Avatar photo

Author: kvk-buldhana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *